नेवाशातील कॉंग्रेसचे मूठभर कार्यकर्तेही सैरभैर

वाबळे : विखे नाहीच पण आता थोरात देखील लक्ष देईना

नेवासे –
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर नेवासे तालुक्‍यात कॉंग्रेस औषधालाही उरली नाही.विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना मानणारा कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा गट आजही कॉंग्रेसमध्ये आहे. परंतु त्यांना विश्‍वास न घेताच शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कॉंग्रेसच्या उमेदवार प्रचार यंत्रणा राबवित आहे. आता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या मतदारसंघाची जबाबदारी घेतली, परंतू ते देखील मूठभर राहिलेले कॉंग्रेसच्या नेते व कार्यकर्त्यांना दूर ठेवून सोयरेधायऱ्यांच्या मदतीने प्रचार यंत्रणा राबवित असल्याने येथील कॉंग्रेस कार्यकर्ते सैरभर झाल्याची खंत कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रशांत वाबळे यांनी व्यक्‍त केली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर मुठभर कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे काय ती कॉंग्रेस जीवंत होती. अर्थात ही विखेंना मारणारे कार्यकर्ते होते. परंतू या लोकसभा निवडणुकीत ना. विखेंचे सुपूूत्र डॉ. सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही कॉंग्रेसचे कार्यकर्ते विखेंबरोबर गेले नाही. अर्थात ना. विखे यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांकडे कधी लक्ष दिले नाही. तरी येथील कार्यकर्ते ना. विखेंना मानत होते. आतातर ना. विखेंनी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने कार्यकर्त्यांच्या आशा आ. थोरातांकडे लागल्या. पण तेह आता लक्ष देत नाही.

वर्षानूवर्ष येथील प्रस्थापिकांच्या विरोधात भूमिका घेतली. आता ते नेते कॉंग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे नेवाश्‍यातील मूळ कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांना कोणीच वाली राहिला नाही. गेली 13 ते 14 वर्षापासून विखे-थोरात यांच्याबरोबर कॉंग्रेस विचाराशी समरस होऊन कॉंग्रेसमध्ये काम करत आहोत, मात्र या मतदार संघात कॉंग्रेस विखे-थोरात वादाची बळी ठरून कॉंग्रेस पक्ष नेवासे तालुक्‍यात संपत आला तरी देखील आम्ही मूठभर का होईंना कार्यकर्ते कॉंग्रेसचे काम जीव ओतून करीत आहे. मात्र आजही आमच्याकडे दुर्लक्ष होत असल्याने कॉंग्रेसचे मूठभर कार्यकर्ते सैरभर झाल्याची भावना वाबळे यांनी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)