लष्करी अधिकाऱ्याची एकच थप्पड आणि मसूद अजहर पोपटासारखा बोलू लागला 

नवी दिल्ली – लष्करी अधिकाऱ्याची एकच थप्पड आणि मसूद अजहर पोपटासारखा बोलू लागला, अशा शब्दात मसूद अजहरच्या स्थितीचे वर्णन सिक्कीमचे माजी पोलीस महासंचालक अविनाम मोहना यांनी केले आहे. आज भारताला मोस्ट वॉंटेड असलेला हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्‍या मौलाना मसूद अजहरला 1994 साली अटक करण्यात आली होती. पोर्तुगालच्या पासपोर्टवर बांगलादेशमार्गे मसूद अजहर भारतात घुसला आणि काश्‍मीला पोहचला होता. अनंतनाग जिल्ह्यात फेब्रुवारी 1994 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती.

कैदेत असताना त्याला बोलते करण्यास फार प्रयत्न करावे लागले नाहीत. लष्करी अधिकाऱ्याच्या एकाच थपडीत मसूद जमिनीवर पालथा पडला आणि पोपटासारखा बोलू लागला असे मोहना सांगतात. आपल्या साऱ्या कारवायांची माहिती आणि पाकिस्तानातून कारवाया करणाऱ्या दहशतवादी गटांची माहिती त्याने घडाघड सांगितली. आपण कोट बलवाल तुरुंगात त्याची अनेकदा तासनतास चौकशी केल्याचे आणि त्याच्यावर पुन्हा बलप्रयोग करण्याची वेऴ आली नाही असेही मोहना यांनी सांगितले. पाकिस्तानसाठी आपण अतिशय महत्त्वाचे असून पाकिस्तान आपल्याला फार काळ कैदेत राहू देणार नाही असे मसूद अजहर खात्रीपूर्वक सांगत असे.

1995 साली दिल्लीतील काही परदेशी नागरिकांच्या सुटकेबदली मसूद अजहरला मुक्त करण्याचा प्रयत्न झाला, पण अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्लचा शिरच्छेद करणाऱ्या ओमर शेखला अटक झाल्याने तो विफल ठरला. 1997 सालचा तसाच प्रयत्नही विफल झाला मात्र डिसेंबर 1999 मध्ये आयसी -814 विमानातील प्रवाशांच्या बदली ओमर शेख आणि मुस्ताक अहमद झरगार यांच्यासह मसूदला मुक्त करण्यात आले. त्यानंतर त्याने जैश-ए-मोहम्मदची स्थापना केली आणि कालच्या 40 सीआरपीफ जवानांचा प्राण घेणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी हल्ले केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)