7 वर्षाच्या मुलीचा मृतदेह गाझियाबादमध्ये मशिदीच्या गच्चीवर 

गाझियाबाद, (उत्तर प्रदेश): दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 7 वर्षे वयाच्या मुलीचा मृतदेह उत्तर प्रदेशात गाझियाबादेत मुरादनगर भागातल्या एका मशिदीच्या गच्चीवर पोत्यामध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. ही मुलगी शनिवारी दुपारी 1 वाजल्यापासून बेपत्ता झाली होती. तिच्या पालकांनी मुराद नगर पोलिस ठाण्यामध्ये मुलीच्या बेपत्ता होण्याविषयीची तक्रार नोंदवली आहे, असे वरिष्ठ पोलिस अधिक्षक वैभव कृष्णा यांनी सांगितले.
मुराद नगरमधील मशिदीतील कर्मचाऱ्याने पहाटेच्या प्रार्थनेनंतर गच्चीवरील पोते बघितल्यावर ही बाब उघड झाली. या मुलीच्या पालकांना आणि शेजाऱ्यांना तात्काळ याबाबत कळवण्यात आले आहे. या मुलीची हत्या गळा दाबून करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. स्थानिक राजकीय नेते ऐझाझ बेग यांनीच राजकीय वैमनस्यातून आपल्या मुलीची हत्या केली असल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे. या मुलीच्या मामांनी बेग यांच्याविरोधात स्थानिक निवडणूक लढवली होती, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी बेग यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)