सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघाचा राष्ट्रवादीकडून आढावा

गणपतराव देशमुख आणि भारत भालके यांची पवारांशी स्वतंत्र चर्चा

सोलापूर – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी माढा मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पवार यांनी माढा मतदार संघातील दौरे वाढविले आहेत. सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघातील नेत्यांशी चर्चा करून त्यांनी आढावा घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बुधवारची नांदेड येथील सभा आटोपून पवार सोलापूर आले. या ठिकाणी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, शेकापचे आमदार गणपतराव देशमुख, कॉंग्रेसचे आमदार भारत भालके, कॉंग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील, शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांच्यासोबत चर्चा करत सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला.

मतदार संघात विधानसभानिहाय येणारी गावे, लोकसंख्या आदींची पवारांनी माहिती घेतली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगले वातावरण असल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे – पाटील तर शहरात राष्ट्रवादीसाठी पोषक वातावरण असल्याचे शहराध्यक्ष भारत जाधव आणि कार्याध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले. जवळपास 30 मिनिटांच्या चर्चेत सोलापूर आणि माढा या लोकसभा मतदार संघाची स्थिती समजून घेतली. आमदार गणपतराव देशमुख आणि आमदार भारत भालके यांनी पवारांशी स्वतंत्र चर्चा केली. मात्र या चर्चेचा सविस्तर तपशील समजू शकला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)