राफेल गैरव्यवहार याचिकेवर 10 ऑक्‍टोबरला सुप्रिम कोर्टात होणार सुनावणी

नवी दिल्ली: भारत आणि फ्रांस यांच्यातील राफेल विमान खरेदीत झालेल्या गैरव्यवहार संबंधात सर्वोच्च न्यायालयात नव्याने दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर येत्या बुधवारी 10 ऑक्‍टोबरला सुनावणी घेण्यास न्यायालयाने तयारी दर्शवली आहे.

विनीत धांडा नावाच्या एका वकिलाने ही याचिका दाखल केली आहे. ती न्या रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सादर झाली आहे. राफेल कराराचे सारे तपशील सादर करण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. आम्ही युपीए सरकारने केलेल्या करारापेक्षा स्वस्तात ही विमाने घेतली असल्याचा एनडीए सरकारचा दावा आहे. पण त्यांनी त्याच्या किंमती आणि अन्य तपशील सादर केलेला नाही. तो जनतेपुढे खुला करण्याचा आदेश सरकारला देण्यात यावा असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

-Ads-

दसॉल्ट कंपनीने अनिल अंबानी यांच्या कंपनीला दिलेल्या कंत्राटाची माहितीही जाहीर व्हावी अशी त्यांची मागणी आहे. अशाच मागणीची एक याचिका कॉंग्रेस नेते तेहसीन पुनावाला यांनी गेल्या मार्च महिन्यात सादर केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)