सोशल मीडियावर प्रभासचा फोटो व्हायरल 

बाहुबली फेम अभिनेता प्रभासचा आगामी “साहो’ चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात त्याने क्‍लीन शेव्ह लुकमध्ये दिसत आहे. “साहो’नंतर त्याने पुढील चित्रपटाचे शूटिंग सुरू केले असून हा फोटो इटलीतील आहे.
हा रोमांटिक चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन राधा कृष्णा कुमार करत आहे. यात प्रभाससोबत पूजा हेगडे झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण इटली येथे सुरू आहे. याप्रसंगी क्‍लिक केलेला प्रभासचा फोटो समोर आला आहे, जो त्याच्या चाहत्यांमध्ये खूपच व्हायरल होत आहे. या प्रभासचा नवीन लूक पाहण्यास मिळत आहे.
दरम्यान, साहो हा चित्रपट प्रभासचा होम प्रोडॉक्‍शन आहे. मात्र, यात बॉलीवूडमधील मोठे स्टारकास्ट पाहण्यास मिळणार आहेत. यात प्रभास-श्रद्धा कपूरची जोडी प्रथमच एकत्रित आली आहे. तर नील नितिन मुकेश हा निगेटिव्ह भूमिका साकारत आहे. याशिवाय जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, चंकी पांडे, महेश मांजरेकर आदी कलाकारही झळकणार आहेत. “बाहुबली’ आणि “बाहुबली-2’च्या यशानंतर आता प्रभासच्या या आगामी चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)