एसटी कर्मचाऱ्यांचे एक तारखेला वेतन जमा

एसटी महामंडळाने एकरकमी थकबाकी देण्याची मागणी

सातारा  – एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी वेतन जमा करणार असल्याने परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केला होता. त्यानुसार एसटी महामंडळाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या खात्यात दि. 1 रोजी वेतन जमा झाले. तथापि, ज्यासाठी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केली होती ती त्या वेतनवाढीची थकबाकी पूर्णपणे हाती न आल्याने नाराजीचा सुर आहे.

ना. रावते यांनी कर्मचाऱ्यांना अडीच हजार तर अधिकाऱ्यांना पाच हजार बोनस व 1 तारखेलाच वेतन देण्यात येणार असल्याने जाहीर केले होते. शिवाय 1 नोव्हेंबरलाच वेतनवाढीच्या थकबाकीचे पाच हप्ते देण्याच्या सूचना केल्या होत्या. तथापि, वेतनवाढीची थकबाकी 48 हप्त्यांमध्ये देण्याऐवजी एकरकमी मिळावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी आहे. कर्मचाऱ्यांच्या खात्यात दि. 1 रोजी वेतन, 5 हप्ते थकबाकी व बोनस यांची रक्कम जमा झाली आहे. थकबाकीच्या रकमेमध्ये वाढीव वेतनवाढ, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, रजा रोखीकरण यांचा समावेश असेल, असे पत्रकात नमूद केले होते.

एसटी महामंडळ एकरकमी थकबाकी देवून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करेल, अशी कर्मचाऱ्यांमध्ये आशा होती. परंतु, आपल्याच हक्काचे पैसे मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना आणखी किमान तीन ते चार वर्षे वाट पाहावी लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)