छत्तीसगडमधील चकमकीत एक नक्षलवादी ठार; जवान जखमी

संग्रहित छायाचित्र

रायपूर – छत्तीसगडमधील सुकमा येथे आज सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीमध्ये एक नक्षलवादी ठार झाला. या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्याकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात आज सकाळी डब्बाकोंटा परिसरात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला. अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळावरून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here