श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या परिसरात आज सकाळपासून चकमक सुरुच असून जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. तसेच परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे.
#UPDATE Tral encounter: Body of a terrorist has been recovered. Search continues. #JammuAndKashmir https://t.co/HCfHPuChUp
— ANI (@ANI) June 26, 2019
पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्रालच्या जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याचा संशय आहे. त्यामुळे 42 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांकडून त्राल परिसरात विशेष ऑपरेशन हाती घेण्यात आलं आहे. ब्रानापथरीच्या जंगलात जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं. पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरातही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली त्यानंतर या परिसरात कारवाईला सुरुवात केली.