“शटडाऊन’च्या बैठकीतून ट्रम्प यांचा सभात्याग

मेक्‍सिकोच्या सीमेवरील भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलरच्या मागणीवर ठाम

डेमोक्रॅटिक सदस्यांकडून ट्रम्प यांचा प्रस्ताव नामंजूर

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वॉशिंग्टन: अमेरिकेत गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या “शटडाऊन’वर तोडगा काढण्यासाठी विरोधकांबरोबरच्या महत्वपूर्ण बैठकीमधून स्वतः अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीच सभात्याग केला आहे. ट्रम्प यांनी केलेल्या मेक्‍सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी 5.7 अब्ज डॉलरच्या मागणीला विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांकडून नकार कायम राहिल्याने नाराज झालेल्या ट्रम्प यांनी या बैठकीतून सभात्याग केला आहे.

वरिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी आणि सिनेटमधील बहुसंख्यांचे नेते चक स्चूमर यांनी ट्रम्प यांच्यावर “सभागृहातून बाहेर पडण्यापूर्वी टेबलावर हात आपटण्याचा’ आरोप केला. ट्रम्प यांनी सीमेवरील भिंतीच्या मुद्दयावरून विरोधकांशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रांतिय सरकार खुले करण्याची विरोधकांच्या मागणीवरून ट्रम्प संतप्त झाले.
“शटडाऊन’ मागे घेतल्यास विरोधकांनी आगामी 30 दिवसात निधी देण्यास पाठिंबा दिला जाईल असे असे पेलोसी यांनी ट्रम्प यांना सांगितले. त्यावर 30 दिवसात काय होणार ? सीमेवरील भिंतीसाठी आताच निधी द्या, अन्यथा “बाय बाय’ असे म्हणून ट्रम्प बैठकीतून निघून गेले.

घुसखोरांना रोखण्यासाठी मेक्‍सिकोच्या सीमेवरील भिंतीसाठीचा निधी हाच हा बैठकीतील मतभेदाचा मुख्य मुद्दा होता. मात्र या निधीसाठी प्रांतीय कामकाज गेल्या 19 दिवसांपासून रोखून धरण्यात आले आहे. मेक्‍सिकोच्या सीमेवरील भिंत हा ट्रम्प यांचा प्रचारातील मुख्य मुद्दा आहे. मात्र या भिंतीसाठी प्रचंड खर्च येईल, तसेच ही उपाय योजना परिणामशून्य ठरेल असे सांगून निधी देण्यास डेमोक्रॅट सदस्य तयार नाहीत. या मतभेदांमुळे 22 डिसेंबरपासून अंशतः “शटडाऊन’ लागू झाले आहे. परिणामी सुमारे 8 लाख कर्मचाऱ्यांना बिनपगारी रजेवर पाठवण्यात आले आहे. यापूर्वी 1995-96 साली 21 दिवसांचा “शटडाऊन’ होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)