शेअरबाजाराच्या मुख्य निर्देशांकांतही झाली मोठी घट 

मारुती, भेल कंपन्यांचे शेअर घसरले 

मुंबई – दुसऱ्या तिमाहीत मारूती कंपनीच्या नफ्यात घट झाल्यामुळे या कंपनीच्या शेअरचे भाव जुरुवारी 1 टक्‍क्‍यापर्यंत कमी झाले. कंपनीने जाहीर केलेल्या ताळेबंदानुसार दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 9.8 टक्‍क्‍यांनी कमी होऊन तो 2240 कोटी रुपपये इतका झाला आहे. बाजारात एकूणच वातावरण नकारात्मक असल्यामुळे चांगला ताळेबंद जाहीर केलेल्या भेल कंपन्यांच्या शेअरच्या भावातही आज 8 टक्‍क्‍यांनी घट झाली. कंपनीच्या नफ्यात मात्र 60 टक्‍क्‍यांनी वाढ होउन तो 185 कोटी रुपये झाला आहे. विक्रीचा जोर जास्त असल्यामुळे गुरुवारी शेअरबाजार निर्देशांकही बरेच घसरले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जागतिक व्यापारयुद्ध आणि काही देशांतील तणावाचे कारण होऊन काल अमेरिकेचे शेअरबाजार निर्देशांक कमी झाले. आता आशियायी आणि युरोपियन शेअर बाजार निर्देशांक कमी झाल्यानंतर सकाळी त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावर झाला. त्यामुळे सकाळपासून भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक पिछाडीवर राहिले. त्यातल्या त्यात आशियायी शेअरबाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचे वारे होते. काल बरीच सुधारणा झालेला रुपया त्यामुळे दुपारी 22 पैशानी कमी झाला होता. त्यामुळे विक्रीची जोर वाढल्याचे ब्रोकर्सनी सांगीतले.

बाजार बंद होताना गुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स कालच्या तुलनेत 343 अंकानी कोसळून 33690 अंकावर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 99 अंकानी म्हणजे 0.98 टक्‍क्‍यांनी कोसळून 10124 अंकावर बंद झाला. चार दिवसांच्या घसरणीनंतर काल सेन्सेक्‍स 187 अंकानी वाढला होता.

जागतिक शेअरबाजारतील नकारात्मक वातावरणाची कारणमीमांसा करताना विश्‍लेषकांनी सांगितले की, अमेरिकेचे व्याजदर जास्त असतांना आणि व्यापारयुद्धाचे सावट कायम असताना अमेरिकेतील कंपन्याचे नकारात्मक ताळेबंद जाहीर झाले. त्यातच युरोप आणि अमेरिकेचे जगात सर्वात जास्त तेल उत्पादन करणाऱ्या सौदी अरेबियाबरोबरचे संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार एक तर सोन्याकडे किंवा अमेरिकेच्या कर्जरोख्याकडे वळत आहेत. त्यामुळे शेअरबाजारातील गुंतवणूक कमी होत आहे.

देशांतील संस्थागत गुंतवणूकदार संस्था निर्देशांकांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी 116 कोटी रुपयाच्या शेअरची खरेदी केली. मात्र परदेशीाल संस्थागत गुंतवणूकदारांनी 340 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री करून नफा काढून घेतला. आगामी काळातही परदेशातील गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घेण्याची शक्‍यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)