झारखंडमध्ये सुरक्षा दलांवरील मोठा हल्ला केला विफल ; 17 कॅनबॉंब जप्त

दुमका (झारखंड): झारखंडमध्ये सुरक्षा दलांवरील हल्ल्याचा एक मोठा कट उधळून लावण्यात आला आहे.
मागील विधानसभा निवडणुकीप्रमाणेच लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरक्षा दलांना उडवण्याचा नक्षलींचा मोठा कट झारखंड पोलीस आणि सीमा सशस्त्र दलांनी उधळून लावला आहे. शनिवारी नक्षलप्रभावित गोपिकांदर जिल्ह्यातील महुआगडी जंगलात नक्षलींविरुद्ध कारवाई करण्यात आली.

या कारवाईत 17 कॅनबॉंब, 200 पेक्षाही अधिक डिटोनेटर, एक हॅंड ग्रेनेड, 1 हजार मीटर कोडेक्‍स वायर, बॅटरी, आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे. जंगलात जमिनीखाली दडवून ठेवलेले 5 किलोग्रॅम वजनाचे 14 आणि 10 किलोग्रॅम वजनाचे 3 कॅनबॉंब निकामी करण्यात आले आहेत. ज्या भागात पोलीस आणि अर्धसैनिक दलांचा नेहमी वावर असतो त्याच भागात हे बॉंब जमिनीत पुरून ठेवण्यात आले होते. या कारवाईमध्ये एसएसबीचे सेकंड कमांड ऑफिसर संजय गुप्ता, डेप्युटी कमांडंट ललित साह आणि नरपत सिंह, इमॅन्युल बॉस्की, गोपेकांदर ठाणे प्रभारी, पोलीस आणि एसएसबी जवान सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जप्त करण्यात आलेले बॉंब देशी बनावटीचे नसून रेग्युलर ग्रेनेड आहेत. अशा प्रकारचे बॉंब नक्षलींकडे येणे ही गंभीर बाब असल्याचे एएसपी इमॅन्युअल बॉस्की यांनी सांगितले आहे. गोपिकांदर जिल्ह्यातील महुआगडी जंगलभागात विजय दा, पीसी दा, सुधीर किस्कू, प्रेमशीला, सिद्धू असे अनेक नक्षली कार्यरत आहेत. विजया दा या नक्षलीवर 25 लाख रुपयांचं इनाम ठेवण्यात आलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)