जम्मू काश्मिरी तरुणांचा सैन्यभरतीला उदंड प्रतिसाद

श्रीनगर – भारतीय सैन्यदलातर्फे आज जम्मू-काश्मिरातील डोबा येथे प्रादेशिक सैन्य भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. भारतीय सैन्यदलातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेला जम्मू-काश्मिरातील तरुणांनी उदंड प्रतिसाद दिला असून या भरती प्रक्रियेमध्ये दोन हजाराहून अधिक युवकांनी सहभाग नोंदवला आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना सैन्य भरतीसाठी आलेल्या मुबसीर अली नामक एका काश्मिरी युवकाने म्हंटले कि, ‘मला देशाची आणि माझ्या कुटुंबाची सेवा करण्यासाठी सैन्यदलामध्ये भरती व्हायचे आहे. भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची पाकिस्तानातून सुखरूप सुटका झाल्याने येथील तरुणांना सैन्यदलात सामील होण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.” असे मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)