या लहानगीने केली वाघाच्या ‘बछड्याशी’ मैत्री

चीन’ हा देश नेहमीच काही ना काही अजब-गजब कारणांमुळे चर्चेत असतो. अशीच एक अजब घटना चीन येथील क्वान्झो प्रांतामध्ये असणाऱ्या ‘डोंघू’ प्राणिसंग्रहालयामध्ये घडली आहे. डोंघू प्राणिसंग्रहालयात काम करणाऱ्या एका सुरक्षा रक्षकाच्या मुलीने चक्क वाघाच्या बछड्याशी मैत्री केली आहे. सून झायोजिंग नामक या ९ वर्षांच्या लहानगीने वाघाच्या बछड्याशी अत्यंत घनिष्ट मैत्री केली आहे. याबाबत सूनचे वडील सांगतात की “सूनच्या वर्गात असणाऱ्या मुलींना वाघाच्या बछड्याची भीती वाटते मात्र सूनला बछड्याशी खेळायला आवडते. सूनने या बछड्याचे नाव ‘हुनिवू’ असं ठेवलं असून ती बछड्याला अंघोळ घालणे, बॉटलने दूध पाजणे अशी कामे करत असते.”


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)