बिग बॉस मालिका बंद करण्यासाठी वकिलाची कोर्टात धाव 

चेन्नई: भारतामध्ये ‘बिग बॉस’ ही टीव्ही मालिका चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. सुरवातीला हिंदी भाषेमध्ये सुरु झालेली ही स्पर्धात्मक मालिका आता विविध प्रादेशिक भाषांमध्ये देखील सुरु करण्यात येत आहे. ‘बिग बॉस’ मराठी मालिका नुकतीच पार पडली असून तिला देखील प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला होता. ‘बिग बॉस’ मालिकेचे व वादांचे नाते जुने असून अगदी पहिल्या सिझन पासूनच ही मालिका या-ना-त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे.
दरम्यान अशाच एका वादाच्या भोवऱ्यात तामिळ भाषेमध्ये सुरु झालेला बिग बॉसचा दुसरा सिझन अडकताना दिसत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तामिळ बिग बॉसचा दुसरा सिझन सुरु झाला असून कमल हसन या शो-चा होस्ट म्हणून काम पाहत आहे. लॉईसलं रमेश नामक एका स्थानिक वकिलाने या कार्यक्रमाविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली असून या शो-वर बंदी घालावी अशी त्यांची मागणी आहे. रमेश यांच्या मते मक्कल निधी मैअम या राजकीय पक्षाचा संस्थापक असलेला कमल हसन बिग बॉस या कार्यक्रमाच्या माध्यमातून तामिळ नाडुच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची मानहानी करत आहे. 
रमेश यांनी याबाबत बोलताना म्हंटले की “कमल हसन व या कार्यक्रमाची प्रोडक्शन टीम जाणून बुजून जयललिता यांना ‘हुकूमशहा’ दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.” आपल्या वक्तव्याला पुरावा देताना त्यांनी कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या एका स्पर्धेचा दाखल दिला आहे. जर ही मालिका बंद करण्यात आली नाही तर आपण कोर्टामध्ये जाणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)