गुवाहाटी – आसाममधील महत्वाचे शहर असणाऱ्या गुवाहाटीत गुरूवारी पोलिसांनी शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा मोठा जप्त केला. त्या शहरात एक दिवस आधी झालेल्या ग्रेनेड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ती कारवाई केली. गुवाहाटीतील एका शॉपिंग मॉलसमोर बुधवारी झालेल्या ग्रेनेड स्फोटात 12 जण जखमी झाले. त्या घटनेनंतर सतर्क झालेल्या पोलिसांनी एका घरातून शस्त्रास्त्रे आणि स्फोटकांचा साठा जप्त केला.
तो साठा केल्यावरून एका दाम्पत्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्या साठ्यात बॉम्ब बनवण्यासाठी वापरण्यात येणारी सामग्री असल्याचे समजते. दरम्यान, उल्फा या दहशतवादी संघटनेच्या एका गटाने ग्रेनेड हल्ला घडवल्याचा संशय आहे. त्या हल्ल्याशी आणि स्फोटकांच्या साठ्याशी उल्फाचा संबंध आहे का, या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत.