कोरेगावात बंदला शंभर टक्के प्रतिसाद

बाजारपेठेत शुकशुकाट

कोरेगाव – महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाला कोरेगावात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी कोरेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.

-Ads-

याबाबत अधिक माहिती अशी की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी कोरेगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरेगाव शहरातील गुरुवारचा आठवडा बाजार, आझाद चौक आणि साखळीपुलावरील भाजी मंडळी बंद ठेवण्यात आली होती. कोरेगाव शहरातील रेल्वेस्टेशन परिसर, आझाद चौक, नवीन एस.टी.स्टॅंड परिसर, कोरेगाव बाजार समिती परिसर, मेन रोड, हुतात्मा स्मारक परिसर, कापडपेठ, जळगाव नाका, जुना मोटार स्टॅंड परिसर, न्यू हिंदभवन परिसर, पंचायत समिती परिसर, कुमठे फाटा, जुनीपेठ, चौथाई, वेतळगल्ली, बाजारपेठ, बुरुडगल्ली, जानाई गल्ली, संभाजीनगर, सुभाषनगर, भगवा चौक, लक्ष्मीनगर, दत्तनगर व महादेवनगर या सर्व परिसरातील दुकाने व व्यापारी संकुले दिवसभर बंद होती.

पेट्रोलपंप, मच्छी मार्केट, मटण मार्केट, दौलत चित्र मंदीर, हॉटेल्स, परमिट रूम, चहाचे गाडे, पानपट्टी दिवसभर बंद होत्या. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोरेगाव शहरात पोलिसांना सहकार्य करत उस्फुर्तपणे बंद पाळण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)