मोमो व्हाट्सअँप चॅलेंज गेममुळे मुलीने केली आत्महत्या, भारतातील पहिला बळी 

गेल्या वर्षी ब्लु व्हेल नावाचा एक गेम आला होता. त्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले आणि नंतर तो गेम बंद करण्यात आला. त्याचप्रकारची आणखी एक गोष्ट सध्या खूप चर्चेचा विषय बनत आहे ती म्हणजे मोमो  व्हाट्सअँप  चॅलेंज गेम.

या  मोमो गेममुळे जगभरत आत्महत्या होत आहेत. भारताबाबतची पहिली घटना आज जयपूरमध्ये उघडकीस आली आहे. दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या एका मुलीने आपल्या वाढदिवसाच्या तीन दिवसानंतर हाताची नस कापली आणि पंख्याला फाशी घेऊन आत्महत्या केली. तिच्या मोबाईलची ब्राऊजरच्या हिस्ट्रीमध्ये मोमो चॅलेंजचे नियम दिसले आणि अंगावर देखील खुणा होत्या. त्यामुळे  तिचा मृत्यू हा मोमो गेम मुळेच झाला असणार, अंदाज वर्तवला जात आहे

दहावीत शिकणाऱ्या छवी नामक या मुलीने आपल्या वाढदिवसानंतर ३ दिवसांनी म्हणजे ३१ जुलैला आत्महत्या केली होती. तपासानंतर आता समजत आहे की तिने मोमो चॅलेंजमुळे आत्महत्या केली होती.

ब्लु व्हेल गेमप्रमाणे या गेममध्ये देखील शेवटचा टप्पा हा मृत्यू आहे. तिने आपल्या सुसाइड नोटमध्ये  लिहले आहे की, मला वाढदिवसाच्या दिवशीच मरायचे होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)