लखनौ – समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खान यांनी प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप करत, एका विशिष्ट समाजाची मते मिळू नयेत म्हणून त्यांना मतदान करण्यास जाऊ नये यासाठी धमकावले जाते, असा आरोप केला होता. खान यांचे वक्तव्य आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचे मानून प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अगोदरच खान यांच्या विरोधात नुकताच जयाप्रदा यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.