सुरतमध्ये अग्नितांडव ; जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या चौथ्या मजल्यावरून उड्या

सुरत – गुजरात राज्यातील सुरतमधील तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीत अनेक लोक अडकल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून अग्निशमन दलाच्या 18 गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, सुरत येथील इमारतीला आग लागल्यानंतर अनेकांनी घाबरून जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या आहेत.

सुरतमध्ये आगीची भयंकर घटना; जीव वाचवण्यासाठी नागरिकांच्या चौथ्या मजल्यावरून उड्या

गुजरात राज्यातील सुरतमधील तक्षशिला नावाच्या एका इमारतीला भीषण आग लागली आहे. या इमारतीत अनेक लोक अडकल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीला आग लागल्यानंतर अनेकांनी घाबरून जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरून उड्या मारल्या आहेत. जवळपास 15 जणांचा या आगीत मृत्यू झाल्याचं समोर येत आहे… सविस्तर वाचा….

Posted by Dainik Prabhat on Friday, 24 May 2019

सूरतचे पोलिस आयुक्त सतीश कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास 15 विद्यार्थ्यांचा या आगीत मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. आगीत मृतांची संख्या वाढू शकते असं देखील त्यांनी सांगितले आहे.

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी सदर आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यानी आगीत मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुंटुंबियाना आर्थिक मदत म्हणून 4 लाख रूपये देण्याचे घोषित केले आहे.

https://twitter.com/ANI/status/1131901976508133377

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)