आषाढीसाठी पंढरीत मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांची मांदियाळी

सोलापूर – आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह डझनभर मंत्र्यांची मांदियाळी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी सोलापूर येथे श्रमिक पत्रकारांच्या घरांचा पायाभरणी, तर सोलापूर विद्यापीठात नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ पार पडला. पंढरपूर येथे सायंकाळी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, इस्कॉनच्या कार्यक्रमास हजेरी लावली. तर पहाटे एक वाजता मुख्यमंत्री फडणवीस सपत्नीक विठ्ठलाची महापूजा करतील. मंत्री व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यामुळे महसूल व पोलीस प्रशासनावर मोठा ताण असणार आहे.

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, गृह राज्यमंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्य पुनर्वसन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी आदी मंत्री उपस्थित राहणार आहे. पंढरपूर शहरात आयोजित विविध कार्यक्रमांसही त्यांची उपस्थिती राहिल. यानंतर पहाटे मंदिरात विठ्ठलाच्या महापूजेस उपस्थिती लावतील.

पंढरपुरातील विश्रामगृहे झाली हाऊसफुल्ल

पंढरपूर शहरातील शासकीय विश्रामगृह, भक्तनिवासातील विश्रामगृह सर्व फुल्ल झाल्याने अकलूज, इंदापूर येथील विश्रामगृह आरक्षित करण्यात आली आहेत. पंढरपूरातील विश्रामगृहात मुख्यमंत्री व इतर कॅबिनेट मंत्र्यांसाठी आरक्षित केले आहेत. भक्त निवास सुट मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासाठी राखीव ठेवले आहेत. यामुळे काही मंत्र्यांची पंढरपूर शहराच्या बाहेरील विश्रामगृहावर व्यवस्था करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)