जम्मू-काश्मीरहून तेलंगानाला जाणारा ‘सीआरपीएफ’ जवान बेपत्ता, लूकआऊट नोटीस जाहीर

संग्रहित छायाचित्र........

हैदराबाद – जम्मू-काश्मीरहून तेलंगानामध्ये बदली झालेला सीआरपीएफचा एक जवान बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. संबंधित जवान कामावर रूजू होण्याकरिता तेथे पोहचण्यापूर्वीच ट्रेनमधून बेपत्ता झाला आहे. जीआरपीने यासंबंधी लूटआऊट नोटीस काढली आहे.

सीआरपीएफचे एएसआय अर्जुन दुबे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अर्जुन, हे तेलंगानाला जाणाऱ्या सीआरपीएफच्या या टीमचे नेतृत्व करत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिंकदराबाद जिल्ह्याचे जीआरपीचे पोलिस अधिक्षक अशोक यांनी सांगितले की, आम्हाला संबंधित जवान बेपत्ता होण्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सीआरपीएफच्या 14 सदस्यीय टीमला जम्मू-काश्मीरहून तेलंगानाकडे स्थलांतरित करण्यात आले होते. दिल्लीकडून 19 फेब्रुवारीला तेलंगाना एक्सप्रेसने हे रवाना झाले होते. 20 फेब्रुवारीला सिंकदराबाद रेल्वे स्टेशनवर 13 जवान खाली उतरले, मात्र जम्मू काश्मीर येथील मूल रहिवासी सलदीप कुमार नावाचा जवान मात्र भेटला नाही. बाकी सर्व जवानांनी काही वेळ त्या जवानाची वाट पाहिली आणि त्यानंतर रिपोर्ट केल्यानंतर ते हकीमपेट सीआरपीएफ क्वार्टरकडे रवाना झाले.

पोलिस अधिकारी यांच्या माहितीनुसार बेपत्ता सीआरपीएफ अधिकारीने ड्यूटीसाठी रिपोर्टींग नाही केले. आणि त्यांचा मोबाईलवरही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यानंतर जीआरपीने बेपत्ता होण्याची तक्रार दाखल केली आहे आणि लूकआऊट नोटीस ही जाहीर करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)