पंजाबनध्ये एका जोडप्याकडून 3 कोटीची रोख रक्कम जप्त

चंदीगड (पंजाब;/हरियाणा): पंजाब पोलीसांनी एका जोडप्याकडून 3 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. मानसा बस स्टॅंडजवळ चालू असलेल्या नित्याच्या तपासणीत पोलीस टीमने एक एसयूव्ही कार थांबवली. हरियांणातील सिरसा येथून ही कार आली होती.

या बॅगेत रुपये 500 आणि 2,000च्या नोटांनी भरलेल्या दोन बॅगा पोलीसांना सापडल्या. मात्र कारमधील दोन्ही व्यक्तींना-निर्मल सिंह आणि सुखचैन कौर यांना त्या रकमेबाबत स्पष्टीकरण देता आले नाही, असे मानसाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनधीर सिंह यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कारमधील 2.99 कोटी रुपये ताब्यात घेऊन त्याबाबत आयकर विभागाला माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)