राफेलच्या फेरविचारा संदर्भातील याचिकांची एकत्रित सुनावणी

नवी दिल्ली – राफेल विमान खरेदी व्यवहार तपासणीची मागणी संदर्भातील निकालाबाबत फेरविचाराची मागणी करणाऱ्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी करण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षी 14 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयाने राफेल व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी फेटाळून लावली होती.

या निकालावर फेरविचार करण्याच्या चार याचिका दाखल झाल्या असून त्यापैकी एक याचिका रजिस्ट्रीकडे प्रलंबित असल्याचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी सांगितले. या चार याचिकांवरील सुनावणीसाठी पिठातील न्यायाधीश बदलावे लागतील, असेही न्या. गोगोई यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राफेल प्रकरणी त्वरित सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी केली आहे. या याचिकांवरील फेरविचाराबरोबरच काही सरकारी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाला दिशाभूल करणरी माहिती दिल्याची याचिकाही दाखल करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी राफेल व्यवहाराच्या त्वरित चौकशीची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)