नवी दिल्ली: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेते कमल हसन “नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता” असे वक्तव्य केले होते. त्यामुळे वादात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कमल हसन यांना जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली आहे.
कमल हसन यांनी मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाची स्थापना केली असून ते सध्या तामिळनाडूतील मध्यावधी निवडणुकांसाठी जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. अशातच आज कमल हसन यांनी चेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी वादग्रस्त विधान केले होते.
दरम्यान, हिंदू धर्माशी ‘दहशतवाद’ जोडुन हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कमल हसन यांच्याविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
A criminal complaint has been filed in a Delhi's Patiala House Court against Kamal Haasan for allegedly 'hurting religious sentiments of Hindus by associating terrorism with Hindu religion in Tamil Nadu on May 12'. (File pic) pic.twitter.com/LiC4IUiuoQ
— ANI (@ANI) May 14, 2019