आग्र्यातील जळीतकांडानिषेधार्थ लातुरात “आप’चा कॅंडल मार्च

लातूर: आग्रा येथे शालेय विद्यार्थीनीला जिवंत जाळल्याचा निषेध म्हणून लातूरमध्ये आम आदमी पार्टीच्यावतीने कॅंडल मार्च काढण्यात आला. देशभरात “बेटी पढाव आणि बेटी बचाव’चे नारे दिले जात आहेत पण देशात सातत्याने ,अल्पवयीन मुली, महिला, गरीब, दलित, अल्पसंख्यावर अन्याय, अत्याचारच होत आहेत. पण केंद्र किंवा राज्य शासनांकडून कायद्याची कठोर अंमलबजावणी करून आरोपींना कठोर शिक्षा होत नाही.

त्याचाच एक भाग म्हणून परवा आग्रा येथील एक निष्पाप शालेय मुलीला जिवंत जाळण्यात आले. समाजाची असंवेदनशीलता याला कारणीभूत असून,समाजाला अशा प्रवृत्तीचा वेळीच विरोध करण्यासाठी जागे करणे आवश्‍यक आहे म्हणून लातूरमध्ये आम आदमी पार्टीच्यावतीने मंगळवार,दि.25 डिसेंबर रोजी महात्मा गांधी चौक ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क दरम्यान कॅंडल मार्च काढण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)