रस्त्यावरील खड्ड्याचा आणखी एक बळी, अज्ञात वाहनाने दुचाकी स्वाराला चिरडले 

ठाणे: महाराष्ट्रामध्ये रस्त्यांवरील खड्यांमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ठाणे जिल्ह्यातील  कल्याणमध्ये आज पहाटे ४च्या दरम्यान खड्ड्यामुळे गाडी घसरल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. कल्पेश जाधव नामक २६ वर्षीय वाळूव्यावसायिक तरुण आपल्या मोटारसायकलवरून कल्याणमधील गांधारी पुला पासून जात असताना रस्त्यात अचानक आलेल्या खड्ड्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले व तो खाली पडला. तेवढ्यात मागून जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने रस्त्यावर पडलेल्या कल्पेशला चिरडले.
कल्याण मधील रस्त्यांवरील खड्ड्यांचा कल्पेश हा ‘चौथा’ बळी आहे. विधानसभेत विरोधक व सत्ताधारीपक्षामध्ये रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. मात्र सामान्य नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)