सोमेश्वरनगर मध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात

प्रतिनिधी (सोमेश्वरनगर): बारामती तालुक्यातील करंजे सोमेश्वरनगर मध्ये बेंदूर मोठ्या उत्साहात (दि१५ सोमवारी) साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात बळीराज्याचा मित्र बैलाचा यादिवशी नवरदेवासारखा थाट असतो. सायंकाळच्या सुमारास सजवलेल्या देखण्या बैलांची सनई, ढोल, ताशे, डफ,आणि हालगी यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर बैल जोड्यांची करंजे सोमेश्वर नगर परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, यावेळी ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सोमेश्वरनगर मध्ये बैलपोळा मोठ्या उत्साहात

प्रतिनिधी (सोमेश्वरनगर): बारामती तालुक्यातील करंजे सोमेश्वरनगर मध्ये बेंदूर मोठ्या उत्साहात (दि१५ सोमवारी) साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात बळीराज्याचा मित्र बैलाचा यादिवशी नवरदेवासारखा थाट असतो. सायंकाळच्या सुमारास सजवलेल्या देखण्या बैलांची सनई, ढोल, ताशे, डफ,आणि हालगी यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर बैल जोड्यांची करंजे सोमेश्वर नगर परिसरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, यावेळी मिरवणुकीत ग्रामस्थही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Posted by Digital Prabhat on Monday, 15 July 2019

सोमेश्वरनगर परिसरातील निंंबुत,वाघळवाडी,वाणेवाडी,मुरुम आणि चौधरवाडी या गावामध्ये बेंदूर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रामीण भागातील बैलजोडी प्रमाण घटले असले तरी सोमेश्वरनगर परसातील काही गावांमध्ये या परंपरा जतन होताना दिसत आहे.

ग्रामीण भागात बेंदूर हा शेतकर्‍यांच्या दृष्टीने अतिशय उत्साहाचा सण आहे. या दिवशी शिंगे साळून त्याला हुंगुळ लावण्याची प्रथा आहे. आंबाडीचे सुत काढून त्याची वेसन नविन बैलाच्या नाकात घातली जाते. नविन घुंगर माळा, नविन झुल वेगवेगळया प्रकारचे हिंगुळ बैलाच्या शिंगांना लावून पोळयाच्या दिवशी बैलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असतो. वर्षभर शेतात राबणारा बैल या दिवशी मात्र नवरदेव असतो. त्याला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखविला जातो.

शेतकऱ्यांसाठी अतियश उपयुक्त प्राणी म्हणून बैल ओळखला जातो. बेंदूर दिवशी शेतकरी बैलाच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करतात. पण हा दिवस अंधश्रद्धा बाळगून साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शास्त्रीय दृष्टिकोनातून हा सण साजरा करण्याची गरज आहे. आषाढ, श्रावण किंवा भाद्रपद आणि कार्तिक महिन्याच्या अमावस्येला प्रदेशपरत्वे बैलपोळा सण साजरा केला जातो. यामध्ये नंदीपोळा व बेंदूर असे लोकसंस्कृतीत तीन वेगवेगळे प्रकार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)