राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान बलून स्फोट 

गॅसच्या फुग्यांमुळे उडाला आगीचा भडका 
जबलपूर: जबलपूर येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आज रोड शो सुरू असताना अचानक गॅसच्या फुग्यांमुळे आगीचा भडका उडाला. या दुघर्टनेत सुदैवाने आग जास्त न भडकल्याने मोठा अनर्थ टळला. राहुल गांधींसह सर्व जण सुखरुप आहेत.
कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी आरतीची तयारी केली होती. शास्त्री ब्रिज परिसरात गॅसने भरलेले फुगेही होते. आरतीचे ताट गॅसच्या फुग्यांच्या संपर्कात आल्यामुळे लहानसा स्फोट होऊन आगीच्या ज्वाळा उठल्या.
ही घटना राहुल गांधी यांच्या बसपासून काही फूट अंतरावरच घडली. त्यामुळे राहुल गांधींसह गाडीतील सर्वच नेते घाबरले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ जमावाला दूर लोटले.
दरम्यान, मध्य प्रदेशसह राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरममध्ये विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा शनिवारीच जाहीर करण्यात आल्या आहेत. 28 नोव्हेंबरला मध्य प्रदेश आणि मिझोरममध्ये विधानसभेसाठी मतदान होईल. पाचही राज्यातील निवडणुकांचा निकाल 11 डिसेंबरला हाती येणार आहे.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)