980 विद्यार्थ्यांनी साकारले “जाणता राजा’ महानाट्य

– प्रतिभा महाविद्यालयाच्या स्नेह संमेलनात आगळा वेगळा उपक्रम

पिंपरी – पारंपारिक वेशभूषा, भव्य देखावा, घोड्यावर स्वार होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे झालेले आगमन, शिवराज्याभिषेक सोहळा अशा भव्य-दिव्य थाटात सुमारे 980 विद्यार्थ्यांनी जाणता राजा महानाट्य साकारले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चिंचवड येथील कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल व प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेह संमेलनात महानाट्याचा आगळा-वेगळा उपक्रम राबविला. उपस्थित पालक वर्ग व प्रचंड संख्येने असलेल्या जनसमुदायाने केलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणाने सारा परिसर दुमदुमून गेला. शिवराज्याभिषेक सोहळयाच्या वेळी फटाक्‍याची आतिषबाजी करण्यात आली.

या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलपती डॉ. ई वायूनंदन यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय व राज्य पातळीवर मैदानी खेळ व विविध स्पर्धांमध्ये यश मिळविणारे खेळाडू, तसेच दहावीच्या परीक्षेत अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविलेले नुपूर इंगवले, श्‍वेता उपाध्याय, अथर्व काळे हे विद्यार्थी तसेच नितीन चौरसीया (आदर्श विद्यार्थी) आस्था अगरवाल (आदर्श विद्यार्थीनी) यांचा सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी जमा झालेल्या रकमेतून कर्करुग्ण पीडित आणि जनसेवा फाउंडेशनला प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश वर्धमान जैन व सरिता सोनवणे यांना सुपूर्त करण्यात आला.

यावेळी कमला शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा शहा, सचिव डॉ. दीपक शहा, संचालिका भूपाली शहा, प्राचार्य डॉ. बाबासाहेब सांगळे, डॉ. पौर्णिमा कदम, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता ट्रॅव्हीस, प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या वनिता कुऱ्हाडे, डॉ. के. आर. पाटेकर, संचालक डॉ. सचिन बोरगांवे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)