98 मते असलेले मिझोरमचे सर्वात मोठे चाना कुटुंब मतदानास सज्ज 

आइजल (मिझोरम) – 26-98 मते असलेले मिझोरम मधील सर्वात मोठे चाना कुटुंब मतदानास सज्ज झाले आहे. मिझोरम राज्यात, जिथे केवळ काही मतांनीच हारजितीचा निर्णय लागतो, तिथे एकाच घरात 98 मते असलेल्या चाना कुटुंबाचे महत्त्व फार मोठे आहे. त्यामुळेच तर सर्व उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची चाना कुटुंबाकडे मोठ्या प्रमाणावर ये जा चालू असते.

शेरछिप जिल्ह्यातील जिओना चाना यांच्या कुटुंबात एकूण 162 सदस्य आहेत. त्यात 74 वर्षे वयाचे जिओना चाना स्वत:, त्यांच्या 38 बायका, 32 पुत्र, 18 कन्या, 48 नातवंडे आणि 7 पतवंडांचा समावेश आहे. एका चार मजली घरात हे सर्वजण एकत्रच राहतात. निवडणुकीत कोणाही उमेदवाराचे नशीब बदलवण्याची शक्ती जिओना चाना कुटुंबात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
2 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)