आसाम विषारी दारू प्रकरण : मृतांचा आकडा 94 वर; तर 300 हून अधिक गंभीर

गुवाहाटी – आसामच्या गोलाघाट आणि जोहरहाट जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल 94 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 30 हून अधिक महिलांचा समावेश आहे. तर 300 हून अधिक लोक गंभीर आहेत. कालपर्यंत मृतांचा आकडा 40 पर्यंत होता. आता मृतांच्या संख्येत वाढ होऊन हा आकडा 94 वर पोहोचला आहे.

आसामच्या वैद्यकीय विभागाने याबाबतची माहिती दिली आहे. कालपासून (शुक्रवार) सातत्याने मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा वाढत आहे. अजूनही यातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेप्रकरणी जिल्ह्यातील दोन उत्पादन अधिकाऱ्यांच निलबंन करण्यात आलं आहे. याप्रकरणी 12 जणांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार रूपज्योती कुर्मी यांनी उत्पादन शुल्क मंत्री यांचा राजीनामा मागितला आहे.

उपजिल्हाधिकारी धीरेन हजारिका यांनी सांगितले की, ‘विषारी दारू पिल्याने एकट्या गोलाघाटमध्ये 59 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जोहरतमध्ये 35 जण मरण पावले आहेत’. सरकारने मृतांच्या कुटुंबियाना 2 लाख आणि रूग्णालयात उपचार घेत असलेल्यांना 50 हजार रूपये देण्याची घोषणा केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)