930 ग्रामपंचायतींसाठी 79 टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विविध 26 जिल्ह्यांमधील 930 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरासरी 79 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

सहारिया म्हणाले, ऑक्‍टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतींसाठी हे मतदान झाले. यात 930 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांबरोबरच सरपंचपदाच्या थेट निवडणुकांचाही समावेश आहे. मतदानाची वेळ सकाळी 7.30 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत होती. गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी मात्र सकाळी 7.30 पासून दुपारी केवळ 3.00 पर्यंतच मतदानाची वेळ होती. मतमोजणी गुरूवारी 27 सप्टेंबर रोजी होईल.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हानिहाय ग्रामपंचायतींची संख्या :
ठाणे- 5, रायगड- 96, रत्नागिरी- 15, सिंधुदुर्ग- 3, नाशिक- 20, धुळे- 74, जळगाव- 5, अहमदगनर- 66, नंदुरबार- 54, पुणे- 47, सोलापूर- 59, सातारा- 32, सांगली- 1, कोल्हापूर- 15, बीड- 2, नांदेड- 12, उस्मानाबाद- 4, लातूर- 3, अकोला- 3, यवतमाळ- 3, बुलडाणा- 2, नागपूर- 373, वर्धा- 15, चंद्रपूर- 15, भंडारा- 2 आणि गडचिरोली- 4.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)