90 टक्के राज्यसभा सदस्य कोट्यधीश, सरासरी उत्पन्न 55 कोटी

दिल्ली -राज्यसभेचे सुमारे 90 टक्के सदस्य कोट्यधीश असून राज्यसभा सदस्यांची सरासरी मालमत्ता सुमारे 55 कोटी रुपयांची असल्याची माहिती एका अहवालात देण्यात आलेली आहे. सध्याच्या 233 पैकी 229 राज्यसभा सदस्यांच्या स्वघोषित मालमत्तेच्या माहितीच्या अभ्यासावरून हे निष्कर्ष काढण्यात आलेले आहेत. नॅशनल इलेक्‍शन वॉच अँड ऍसोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

सध्याच्या 229 पैकी 201 म्हणजे 88 टक्के सदस्य कोट्यधीश आहेत. आणि राज्यसभा सदस्यांची सरासरी मालमत्ता 55.62 कोटी रुपयांची असल्याची माहिती देण्यात आली आहे. जेडीयू चे महेंद्र प्रसाद यांची मालमत्ता  सर्वाधिक-4078.41 कोटी रुपयांची आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांची मालमत्ता 1001.64 कोटी रुपयांची आहे. भाजपाच्या रविंद्र प्रसाद सिन्हा यांची मालमत्ता 857.11 कोटी रुपयांची असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

पक्षानुसार विचार केल्यास भाजपाच्या 64 सदस्यांची सरासरी मालमत्ता 27.80 कोटी; कॉग्रेसच्या 50 सदस्यांची सरासरी मालमत्ता 40.98 कोटी, समाजवादी पक्षाच्या 14 सदस्यांची सरासरी मालमत्ता 92.68 कोटी आणि तृणमूलच्या 13 सदस्यांची सरासरी मालमत्ता 12.22 कोटी रुपये इतकी आहे. 229 पैकी 51 जणांनी स्वत:वर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची आणि 20 जणांनी गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)