दोन अपघातात 9 जण ठार

बीड, मनमाड: बीड आणि मनमाड येथे झालेल्या दोन अपघातात 9 जणांचा मृत्यू, तर 11 जण जखकी झाले आहेत. बीड येथे लग्नसमारंभासाठी जाणाऱ्या वाहनास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर समोरून येणा-या ट्रकने धडक दिली. यात चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी आहे.

तेजस गुजर, अक्षय उर्फ आकाश रामलिंग गाढवे, सौरभ लोहारे आणि मंगेश कुंकूकरी अशी मृतांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये नवरदेवाच्या भावाचाही समावेश असल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर शुभम दत्तात्रय उंबरे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अपघातातील सर्व तरुण 25 ते 30 वयोगटातील असून शुभम वगळता उर्वरित सर्व एकमेकांचे जवळचे नातेवाईक आहेत. तेजस गुजरच्या भावाचे रविवारी कपिलधार येथे लग्न असल्याने हे सर्व तिकडे गेलेले होते. काही कामानिमित्त हे पाच तरुण बीडकडे गेले असताना हा भीषण अपघात झाला.

मनमाडमधील अपघातात 5 जण दगावले

मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळील हॉटेल दौलत समोर दोन गाड्यांचा अपघात झाला आहे. यात 5 जण दगावले आहे, तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींना पिंपळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. हा अपघात आयशर गाडीला झाला असून या गाडीतील सर्व जण हे चांवडच्या वडाळी-भोई येथील केंद्राई येथे कार्यक्रमासाठी येत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)