स्फोटातील मृतांमध्ये पश्‍चिम बंगालमधील 9 जण

संग्रहित छायाचित्र.......

उत्तर प्रदेश : या स्फोटात मरण पावलेल्या 13 जणांमध्ये पश्‍चिम बंगालमधील माल्दा येथील 9 जणांचा समावेश आहे. त्यांचे मृतदेह आणण्यासाठी माल्दाचे जिल्हादंडाधिकारी आणि पोलिसांचे पथक भदोही गावाकडे रवाना झाले आहे.

माल्दाचे सुमारे 20 जण अलिकडेच भदोही येथील कारपेट फॅक्‍टरीमध्ये कामासाठी रुजू झाले होते. मरण पावलेल्या 9 पैकी 8 जण माल्दा येथील एनायेतपूर येथील आणि एकजण माथुरापूर ग्रामपंचायतीच्या परिसरातील रहिवासी आहे. माल्दातील अनेक कामगार पश्‍चिम बंगालच्या बाहेरील राज्यांमध्ये कार्यरत असतात. दोन्ही जिल्ह्यांच्या पोलिस अधिक्षक चर्चा करत आहेत, असे माल्दाचे जिल्हादंडाधिकारी कौशिक भट्टाचार्य यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)