बीटकॉईन प्रकरणी 9 आरोपींना अटक 

मुंबई: क्रिप्टोकरन्सी असलेले बीटकॉईन घेऊन त्या बदल्यात मूल्य नसलेले आभासी चलन देऊन पुण्यातील 124 गुंतवणूकदारांची सुमारे 11 कोटी 3 लाख 64 हजार 692 रूपयांना फसवणूक केली आहे. या प्रकरणी 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली आहे.

एमकॅप हे आभासी चलन देऊन लोकांची फसवणूक झाल्याप्रकरणी विधानसभेचे सदस्य सुभाष साबणे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. फसवणूकीविरोधात गुंतवणूकदारांच्या तक्रारीवरून 9 आरोपींवर निगडी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायदा 2008 चे कलम 66 डी एमपीआयडी कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींविरूद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले असून हा गुन्हा न्यायप्रविष्ठ असल्याचे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)