9.3 कोटीहून अधिक पॅन कार्डस आधारला जोडली-आय कर अधिकारी

नवी दिल्ली, -9.3 कोटीहून अधिक पॅन कार्डस आधारला जोडली गेली असल्याची माहिती एका वरिष्ठ आयकर आधिकाऱ्याअने दिली आहे. एकूण सुमारे 30 कोटी पॅन कार्डपैकी ही संख्या साधारणपणे 30 टक्के असून जुलै या दोन महिन्यात सुमारे 3 कोटी पॅन कार्डस आधारला जोडली गेली असल्याची माहिती देण्यात आलेली आहे.

ही दोन कार्डे जोडण्याची मुदत सीबीडीटीने (सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्‍ट टॅक्‍सेस) 31 ऑगस्टपर्यंत वाढवली असल्याने ही संख्या वाढण्याची शक्‍यता या अधिकाऱ्याने बोलून दाखवली आहे. इन्कम टॅक्‍स रिटर्न भरण्यासाठी दोन महत्त्वाचे नंबर-आधार नंबर्र आणि पॅन नंबर जोडून नवीन पॅन (पर्मनंट अकाऊंट नंबर) घेणे सरकार ने अनिवार्य केले आहे. आणि आधार नंबर पॅन नंबरला न जोडल्यास आयटीआर प्रोसेसिंग होणार नाही, अशी सूचनाही दिली आहे. 1 जुलै पासून सुरु झालेली आधार -पॅन जोडण्याची ही योजना आता 31 ऑगस्ट पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

आधार आणि पॅन जोडण्यचा ई फायलिंगशी जोडण्याचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने कोणतीही कालमर्यादा निश्‍चित केलेली नाही, असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अलीकडेच लोकसभेत सांगितले आहे, मात्र वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांसाठी पॅन आणि आधार नंबरची जोडणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. मात्र वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणारे अणि 80 वर्षांपेक्षा अधिक वय असणारांना त्यातून सूट देण्यात आलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)