9 हजार 858 भटक्‍या श्‍वानांचा चावा

– दरमहा 800 ते 850 जणांना चावा

प्रशांत घाडगे
पिंपरी – शहरातील विविध भागात दिवसें-दिवस भटक्‍या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. शहरातील नागरिकांवर अनेक वेळा भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्याने या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांमध्ये 9 हजार 858 व्यक्तींना भटक्‍या कुत्र्यांनी नागरिकांचा चावा घेतला आहे. या आकडेवारीवरुन दर महिन्याला सरासरी 800 ते 850 जणांना कुत्रा चावणाच्या घटना घडत असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात अनेक ठिकाणी भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहेत. अनेक नागरिक, हॉटेल चालक शिल्लक राहिलेले शिळे अन्न घराजवळ अथवा हॉटेलजवळ टाकत असल्याने कुत्र्यांच्या वावर मनुष्यवस्तीत मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे, कुत्र्यांना हटकण्याच्या नादात कुत्र्यांचे चावण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरात महिन्यागणिक कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लागण होण्याची भिती असते. गेल्या अनेक महिन्यांपासून रेबीज प्रतिबंधक लसीचाही तुटवडा सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये जाणवत आहे. भटक्‍या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण न आल्यास भविष्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित राहणार आहे.

शालेय परिसरात भटक्‍या कुत्र्यांनी लहान मुलांना लक्ष केल्याचे दिसते. तसेच, रात्रीच्या सुमारास भटकी कुत्री समुहाने फिरत असल्याने रात्रपाळी करुन येणारे कामगार घाबरत आहेत. महापालिकेच्या संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांकडून शहरातील भटक्‍या कुत्र्यांना पकडण्याची मोहीम वारंवार राबविली जाते. या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी केल्यानंतर कुत्र्यांना सोडून दिले जाते. कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी महापालिका लाखो रुपये खर्च करते. तरीही भटक्‍या कुत्र्यांची संख्या कमी होताना दिसत नाही.

मागील काही दिवसात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहेत. रस्त्यावरुन चालताना कुत्र्यांची भिती वाटते. अनेकदा कचरा-कुंड्यातील शिळे अन्न व इतर कचरा खाण्यासाठी कुत्र्यांची झुंबड उडत आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाकडून अनेक ठिकाणचा कचरा लवकर उचलला जात नाही. तसेच, अनेक कुत्री पिसाळलेली असल्याने नागरिकांवर कधीही आक्रमकपणे हल्ला करु शकतात. यामुळे, संबंधित विभागाने भटक्‍या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रताप राठोड यांनी सांगितले.

शहरातील भटक्‍या कुत्र्यांना पकडण्याचे काम महापालिकेशी संलग्न असणाऱ्या दोन संस्था व पशू वैद्यकीय विभाग एकत्रित करत आहे. तसेच, नसबंदी न केलेल्या कुत्र्यांचा प्रजनन दर जास्त असल्यामुळे कुत्र्यांची संख्या आटोक्‍यात आणणे जिकरीचे ठरत आहे. तसेच, महापालिकेकडून कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी दीड कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
डॉ. अरुण दगडे, पशू वैद्यकीय अधिकारी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)