9 वा आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून

पुणे – आशय फिल्म क्‍लब आयोजित 9 वा आशियाई चित्रपट महोत्सव सोमवार दिनांक 24 डिसेंबरपासून पुण्यात सुरू होत आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सहयोगाने, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया आणि एशियन फिल्म फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्याने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी महोत्सवाचे संयोजक “आशय फिल्म क्‍लब’चे विरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार आदी उपस्थित होते. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), लॉ कॉलेज रोड, पुणे येथे हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. 7 दिवसांच्या या महोत्सवात 15 आशियाई देशांमधील 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. तसेच, नवीन इराणी चित्रपट हे या महोत्सवाचे खास आकर्षण असणार आहे. “ऑफबीट बॉलिवूड’ या विभागात 2017-18 या वर्षातील काही वेगळ्या धाटणीचे चित्रपट दाखविण्यात येतील. तर “माय मराठी’ या विभागात गेल्या वर्षात गाजलेले आणि नव्याने प्रदर्शित होणारे मराठी चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. “इंडियन रिजनल सिनेमा’ या विभागात गेल्यावर्षी राष्ट्रीय स्तरावर गाजलेले भारतीय प्रादेशिक भाषांतील म्हणजेच कन्नड, मल्याळम, बंगाली, आसामी, ओरिया व मणीपुरी अशा विविध भाषांमधील चित्रपट दाखविण्यात येतील. तसेच यंदाचे वर्ष बाबूजी, गदिमा आणि पु. लं. चे जन्मशताब्दी वर्ष असल्याने त्यांना आदरांजली म्हणून या त्रयींचा गाजलेला “संतपट’ या महोत्सवात दाखविण्यात येणार असून अर्काइव्हने नुकतेच या चित्रपटाचे डिजीटलायझेशन देखील केले असल्याची माहितीही मगदूम यांनी यावेळी दिली. दरम्यान, या महोत्सवाच्या प्रवेशिका दि. 18 डिसेंबरपासून सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत अर्काइव्ह थिएटर, लॉ कॉलेज रोड येथे उपलब्ध असणार आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)