9 वर्षापुर्वीच्या वादासाठी कटप्पाने मागितली माफी

बंगळुरु : बाहुबली 2 द कन्क्‍लूजन चित्रपट प्रदर्शनासाठी प्रेक्षक आकंठतेने वाट पाहत असतानाच कर्नाटकमध्ये या चित्रपटासाठी विरोध वाढत आहे. परंतु, वाद टोकाला जाऊ नये यासाठी कटप्पा अर्थात अभिनेता सत्यराज यांनी माफी मागितली आहे. सत्यराज यांनी ट्‌विटरवर व्हिडीओ पोस्ट करुन कर्नाटकच्या लोकांची माफी मागितली आहे.
दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या बाहुबली- 2 सिनेमाची प्रेक्षक वाट पाहत परंतु, चित्रपट प्रदर्शनासाठी तयार असून वाद मात्र सुरुच आहेत. सुमारे 9 वर्षांपूर्वी तामिळनाडू आणि कर्नाटकशी संबंधित कावेरी नदी वादात सत्यराज यांनी कन्नडविरोधी विधान केले होते. त्यामुळेच कर्नाटकमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत वाद उफाळला आहे. मात्र तामिळ लोकांच्या विकासाबाबत कायमच बोलणार. मग यासाठी इंडस्ट्रीमध्ये मला कोणी काम दिले नाही, तरी काही फरक पडणार नाही, असेही सत्यराज यांनी माफीनाम्यात स्पष्ट केले. कर्नाटकमध्ये बाहुबली -2 चा विरोध सुरु आहे आणि चित्रपट प्रदर्शित न करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर काही स्थानिक पक्षांनी बाहुबली दोन राज्यात प्रदर्शित न करण्याची भूमिका घेतली आहे. तर यापूर्वी राजामौली यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन कर्नाटकच्या लोकांना चित्रपट प्रदर्शित होऊ द्यावा, असे आवाहन केले होते. आता 28 एप्रिल रोजी कर्नाटकमध्ये बाहुबली-2 प्रदर्शित होणार की नाही हे पाहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)