9 लाखाची चारचाकी चोरीस

नगर – उपनगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस मोटारसायकल चोरी, घरफोडी, चारचाकी वाहनांची चोरी आदी चोऱ्यांमध्ये वाढ होत असून या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी नाराजीचा सूर उमटत आहे. उपनगरातील तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 लाख रूपये किंमतीची महिंद्रा कंपनीची चारचाकी चोरी गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील वाहन चालक व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची अधिक माहिती अशी कि फिर्यादी भरत विठ्ठल लांडे (रा. शेंडी ,ता.जि.अ.नगर ) हे त्यांच्या कामासाठी नगर ला आलेले असतांना त्यांनी त्यांच्या मालकिची महिंद्रा कंपनीची एम एच 12 जेयु 2633 क्रमांकाची जीप तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईलिला अपार्टमेन्ट समोरील मोकळया जागेत लावलेली असतांना अज्ञात चोरटयाने पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास चोरून लंपास केल्याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतीत परिसरातील नागरिकांमधुन पोलीस गस्तीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)