9 ऑगस्ट क्रांतिदिनीच शिबीराचे आयोजन 

क्रांतिदिनी रक्तदान शिबीराद्वारे स्टार क्रिकेट क्‍लबची सामाजिक बांधिलकी 
गुरूनाथ जाधव 
सातारा – 9 ऑगस्ट क्रांतीदिनी सातारामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करून स्टार क्रिकेट क्‍लब असोसिएशनने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. सातारा येथील स्टार क्रिकेट असोसिएशन व स्टार क्रिकेट क्‍लब हे दरवर्षी 9 ऑगस्ट क्रांती दिनीच रक्तदान शिबीराचे विशेष आयोजन करत असतात.
सातारा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिकारकांनी आपले रक्त या मातीत सांडले आहे. याची जाणीव ठेवून स्टार क्रिकेट क्‍लबचे सर्व सदस्य सलग तीन वर्षे रक्तदान शिबीर घेत असल्याची माहिती क्‍लबचे अध्यक्ष किरण राजे भोसले यांनी प्रभातशी बोलताना दिली आहे.
रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. गोरगरीब रूग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांना किंवा सातारावासियांना रक्तांची गरज भासल्यास त्यांना क्‍लबच्यावतीने 24 तासात केव्हाही मदत केली जाते. यावर्षी शिबीरामध्ये शंभर क्‍लबच्या सदस्य व मित्रपरिवारांनी रक्तदान केले. क्‍लबमधील सदस्य नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, बालगृहामध्ये फळवाटप असे अनेक उपक्रम क्‍लब करत असते.
मात्र यामध्ये सातत्य राखण्याची किमया क्‍लबच्या सर्व सदस्यांनी केली आहे. सातारा पंचमुखी गणेश मंदिरासमोरील पंचमुखी प्लाझा येथील योगेश स्विटस पेढेवालेच्या हॉलमध्ये सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तुषार राजेभोसले, प्रणव राजेभोसले, सूर्यकांत शेजवळ, डॉ. शरद जगताप, निलेश ओसवाल, महेश शिंदे, रविंद्र पवार,विक्रांत भोसले, योगेश मोदी, प्रशांत नवले, अनिल भुबरे, सरेश नडे, स्वाती पवार,शीला महाडिक, सुप्रिया गायकवाड, प्रियांका सांगळे यांनी रक्तदान शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. सातारामध्ये मराठा क्रांती आंदोलन सुरू असल्यामुळे सदस्यांनी आपले रक्तदान करून आंदोलनामध्ये सहभागी झाले असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)