873 तळीराम वाहनचालकांना दंडाचा ‘डोस’

‘ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह’ : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कारवाई

पुणे – नववर्षाचे स्वागत करताना वाहनचालकांनी मोठ्या प्रमाणात नियमांचा भंग केला. मंगळवारी पहाटेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी पार्ट्या सुरू होत्या. परिणामी, दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तब्बल 873 जणांवर “ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह’ची कारवाई करण्यात आली. नाकाबंदीदरम्यान ही कारवाई करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरात 31 डिसेंबरनिमित्त मोठ्या प्रमाणात हॉटेल, फार्म हाऊस, क्‍लब आदी ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जाते. पार्ट्यांमध्ये मद्यपान करणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळे अनेकदा छोटे-मोठे अपघात होतात. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी 31 डिसेंबर रोजी शहरात प्रमाणात पोलीस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात येते. यामध्ये वाहतूक पोलिसांकडून महत्त्वाच्या चौकांमध्ये 58 अधिकारी आणि 650 कर्मचारी तैनात होते. त्यांनी 44 ठिकाणी “ब्रेथ अॅनालायझर’च्या मदतीने ही कारवाई केली. यामध्ये 693 दुचाकी तर 180 तीनचाकी, चारचाकी वाहनचालकांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली. दरम्यान, या दिवशी सुदैवाने एकही प्राणांतिक अपघात झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

परिसरनिहाय केलेली कारवाई
“ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह’ कारवाई अंतर्गत पोलिसांना येरवडा येथे सर्वाधिक मद्यपी चालक सापडले. येथे 93 दुचाकी आणि 9 चारचाकी मिळून एकूण 102 वाहनचालकांवर ही कारवाई करण्यात आली. यानंतर दत्तवाडी-86, कोरेगाव पार्क-76, भारती विद्यापीठ-52, शिवाजीनगर- 51 जणांवर कारवाई करण्यात आली. तर, कोंढवा येथे 12 आणि खडक पोलीस ठाणे हद्दीत 14 जणांवर कारवाई करण्यात आली.

…वर्षभरात 15 हजार जण जाळ्यात
“ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह’प्रकरणी 2018 या वर्षभरात तब्बल 14 हजार 972 जणांवर कारवाई करण्यात आली. शहरातील 22 वाहतूक विभागांनी ही कारवाई केली. यात सर्वाधिक 1,261 प्रकरणे कोरेगाव पार्क हद्दीत समोर आली. या खालोखाल दत्तवाडी, हडपसर, येरवडा, स्वारगेट परिसरात कारवाई करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)