बिहारमध्ये 871 कोटींचे रस्ते आणि नदी विकास प्रकल्प

File Photo

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बिहारमध्ये नदी विकास आणि रस्ते विकासाचे सात प्रकल्प मंजूर केले असून त्या कामाचे उद्‌घाटन उद्या बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी कृषी मंत्री राधामोहनसिंग हेही उपस्थित राहणार आहेत. यात रक्‍सौल येथे उभारल्या जाणाऱ्या दोन राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा समावेश असून त्या प्रकल्पांसाठी एकूण 505 कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

पिपरककोठी ते मोतिहारी या मार्गावरील राष्ट्रीय महामार्गाचे 69 किमीचे रूंदीकरण केले जाणार आहे. छाप्रा ते मिसरौली दरम्यान दोन पदरी महामार्ग उभारला जाणार असून त्यासाठी 171 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. बाघा आणि पश्‍चिम चंपारण येथे उभारल्या जाणाऱ्या 353 कोटी रूपये खर्चाच्या महामार्गाच्या कामाचे उद्‌घाटनही गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)