माढ्यात 85 हजारांचे मताधिक्‍य

साताऱ्यात नोटाची परंपरा कायम

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नोटा तथा नकारात्मक मतदानाची परंपरा कायम राहिली. मागील निवडणुकीत 10 हजारांपेक्षा जास्त मतदान नोटाला झाले होते. तर यंदाच्या निवडणुकीत 9 हजार 227 मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. त्यामध्ये 60 पोस्टल मतांचा समावेश आहे. माढा लोकसभा मतदारसंघातही तब्बल 3 हजार 666 मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. त्यामध्ये 24 पोस्टल मतांचा समावेश आहे.

सातारा –  सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी विजयाची हॅटट्रीक करत सव्वा लाखांचे मताधिक्‍य प्राप्त केले. तर माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी 85 हजारांचे मताधिक्‍य मिळवत विजय नोंदविला. गुरूवारी रात्री उशिरा मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उदयनराजे भोसले व रणजितसिंह ना.निंबाळकर यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करत निवडीचे पत्र प्रदान केले.

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा 9 उमेदवार रिंगणात होते. निवडणूकीत 11 लाख 15 हजार 434 मतदारांनी ईव्हीएम व पोस्टलव्दारे मतदान केले होते. गुरूवारी झालेल्या मतमोजणी अखेर उदयनराजेंना 5 लाख 79 हजार 26 मते तर प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मते मिळाली. उदयनराजेंनी नरेंद्र पाटील यांचा 1 लाख 26 हजार 428 मतांनी पराभव केला. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सहदेव ऐवळे यांना 40 हजार 673, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आनंदा थोरवडे यांना 6 हजार 963, बहुजन रिपब्लिक सोशॅलिस्ट पार्टीचे दिलीप जगताप यांना 5 हजार 55, अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांना 5 हजार 141, शैलेंद्र वीर यांना 5 हजार 846, सागर भिसे यांना 8 हजार 593 मते मिळाली.

माढा लोकसभा मतदारसंघात तब्बल 31 उमेदवार रिंगणात होते. निवडणूकीत एकूण 12 लाख 16 हजार 319 मतदान झाले होते. मतमोजणीअखेर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 5 लाख 86 हजार 314 तर राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना 5 लाख 550 मते मिळाली. चुरशीच्या झालेल्या लढतीत निंबाळकर यांनी शिंदे यांचा 85 हजार 764 मतांनी पराभव केला. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ऍड. विजय मोरे यांना 51 हजार 532 मते मिळाली. अपक्ष उमेदवार दौलतराव शितोळे यांना 12 हजार 769 मते मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)