85 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या सीमापार शॉटवर आठ धावा द्या – डीन जोन्स

सिडनी – “टी-20 क्रिकेटमध्ये 85 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या शॉटवर सहा धावा न देता आठ धावा देण्यात याव्या अशी सूचना ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू डीन जोन्स यांनी केली आहे. त्याच बरोबर नविन चाहत्यांसाठी हा खेळ आणखी अर्थपूर्ण होण्यासाठी नियमांमध्ये बदल होण्याची गरज असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगीतले.

जोन्स यांनी वन-डे क्रिकेटमध्ये वेगवान धावा करणाऱ्या फलंदाजाच्या रुपाने आपला ठसा उमटविला होता. ते म्हणाले की, “कसोटी क्रिकेटवर अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे, कारण प्रेक्षक आता टी-20 क्रिकेटकडे वळले आहेत. टी-20 मध्ये आणखी नावीन्य आणले पाहिजे. आपल्याकडे उत्तम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे 85 मीटरपेक्षा जास्त लांब गेलेल्या प्रत्येक सीमापार शॉटवर आठ धावा मिळायल्या हव्यात. हा अतिरिक्त बोनस सुरू केल्यास फटकेबाज फलंदाज टी-20ची रंगत आणखी वाढवतील.

57 वर्षांचे जोन्स विद्वान तसेच लोकप्रिय समालोचक आहेत. इतिहासाचा दाखला देताना ते म्हणाले की, “मोठ्या शॉटवरील धावांचे प्रमाण काळाच्या ओघात बदलले आहे. 1870 च्या किंवा 1880 च्या दशकाच्या प्रारंभी चेंडू सीमारेषेवरून गेल्यास पाच धावा मिळायच्या. सहा धावांसाठी चेंडू थेट मैदानाबाहेर मारावा लागायचा.

1898 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ज्यो डार्लिंगने कसोटीतील पहिला षटकार मारला. 1910 च्या सुमारास नियम बदलला. चेंडू सीमारेषेवरून गेला तरी सहा धावा मिळू लागल्या. अशाप्रकारे खेळपट्टीच्या 22 यार्ड अंतराशिवाय खेळातील प्रत्येक नियमात बदल, सुधारणा झाली आहे.’ त्यामुळे काळानुरूप यातही बदल व्हावा असे आपले मत त्यांनी यावेळी मांडले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)