85 बॅंका, 35 पोस्ट ऑफिसमध्ये आधार केंद्र

125 कर्मचाऱ्यांना शासनाने दिले प्रशिक्षण

पुणे- आधार नोंदणी व आधार कार्डमधील दुरुस्तीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 85 बॅंका आणि 35 पोस्ट कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरू केले आहे. यासाठी विविध बॅंकेच्या 125 कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या यूआयडी विभागाकडून प्रशिक्षणही देण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाने आधार क्रमांक देण्यास मुदतवाढ दिली आहे. आधार क्रमांक सर्वच योजनांसाठी आवश्‍यक आहे. त्यामुळे आधार नोंदणीसाठी तसेच कार्डमधील दुरुस्तीसाठी नागरिकांची सर्वच केंद्रांवर गर्दी होत आहे. यापार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने प्रत्येक बॅंकेच्या दहा शाखांमागे एक आधार केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. आधार केंद्र चालविण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे बॅंकांकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बॅंक आणि पोस्ट ऑफिसच्या सुमारे 125 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली. यामध्ये केंद्र सरकारच्या युआयडी प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षणामुळे बॅंकेमध्ये आधार नोंदणी व दुरुस्ती करण्याचे काम सोपे आणि अधिक वेगाने होणार असल्याचे कोडोलकर यांनी सांगितले.

जिल्ह्यात विविध बॅंकांच्या सुमारे 1,600 शाखा आहेत. प्रत्येक दहा शाखामांगे एक आधार केंद्र यानुसार 160 आधार केंद्र बॅकांमध्ये टप्प्याटप्याने सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीस 85 बॅंकांमध्येच आधार केंद्र स्थापन झाले आहे. ज्या बॅंकेच्या शाखेमध्ये आधार मशीन दिले आहेत. त्या बॅंकांनी बाहेर आधार नोंदणीसाठीचा फलक लावणे बंधनकारक आहे. तसेच या केंद्रांवर सर्व नागरिकांना आधार नोंदणी व आधार कार्डमधील दुरुस्तीची सुविधा देणे आवश्‍यक आहे. बॅंकेचे खातेदार नाही, या कारणास्तव आधारची सेवा नाकारू नये, अशा सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)