85 कंपन्यांना थेट उत्पादन बंदीची नोटीस

प्लॅस्टिक बंदी : प्रदूषण नियंत्रण मंडळाची कार्यवाही

पुणे – प्लॅस्टिक बंदीअंतर्गत झालेल्या कारवाईत आतापर्यंत 85 कंपन्यांना बंदीची नोटीस पाठविण्यात आली आहे. बंदी असलेल्या प्लॅस्टिकचे उत्पादन तसेच ईपीआर (एक्‍सटेंडेड प्रोड्युसर्स रिस्पॉन्सिबिलिटी) कायद्याच्या अटी पूर्ण न केल्याबद्दल राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने उत्पादक कंपन्यांविरुद्ध ही कार्यवाही केली आहे.

-Ads-

प्लॅस्टिकमुळे होणारे गंभीर पर्यावरणीय दुष्परिणाम लक्षात घेता, राज्य सरकारने 23 मार्च रोजी राज्यात प्लॅस्टिक बंदी लागू केली होती. यानुसार प्लॅस्टिक आणि थर्माकोल वस्तूंचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर प्रतिबंध आहे. तसेच बंदी नसलेल्या प्लॅस्टिक वस्तूंच्या उत्पादनासाठी “ईपीआर’ क्रमांक आवश्‍यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यातील काही कंपन्यांकडून या बंदीची अंमलबजावणी केली जात नसल्याने मंडळातर्फे अशा कंपन्यांवर धडक मोहीम राबवित त्यांचा प्लॅस्टिक माल जप्त करणे तसेच कंपन्यांच्या बंदीची कारवाई केली जात आहे. मार्च-2018 ते नोव्हेंबर-2018 या कालावधीत पुणे विभागातील सुमारे 85 प्लॅस्टिक उत्पादक कंपन्यांना बंदीची नोटीस पाठविण्यात आली आहे. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, चाकण, सातारा अशा विविध परिसरातील कंपन्यांचा सहभाग आहे.

प्लॅस्टिक बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठीच प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई सुरू केली आहे. बंदीचे आदेश दिलेल्या कंपन्यांची वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. यापुढेदेखील ही कारवाई सुरूच राहणार आहे.
– हेरंबप्रसाद गंधे, प्रादेशिक अधिकारी.

कायद्यात अजूनही अस्पष्टता
“ईपीआर’ कायद्याबाबत अस्पष्टता आहे. त्याअंतर्गत केली जाणारी कारवाई चुकीची आहे. यासंदर्भात अधिक स्पष्ट मार्गदर्शक सूचना काढाव्यात, तसेच जोपर्यंत या कायद्यात स्पष्टता येत नाही, तोपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाने बंदीचे आदेश मागे घ्यावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्लॅस्टिक उत्पादक असोसिएशनने केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)