शुटिंगसाठी “83’ची टीम रवाना

भारतीय क्रिकेट संघाने 1983 सालचा क्रिकेट विश्वचषक रोमहर्षक पद्धतीने जिंकला होता. या वर्ल्डकपची कथा आता बायोपिकच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ’83’ या चित्रपटाद्वारे 1983 सालच्या वर्ल्डकपच्या आठवणी जागृत करण्यात येणार आहेत.

या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह हा कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. तर आदिनाथ कोठारे हा दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे.

यासाठी आज पहाटे रणवीर सिंहसोबत संपूर्ण चित्रपटातील कलाकार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला रवाना झाले. भारतीय क्रिकेट टीमच्या त्यावेळी परिधान केलेल्या कोटमध्ये हे सर्व कलाकार विमानतळावर आले होते. त्यांना घेऊन येणाऱ्या बसवर त्या वर्ल्डकपच्या छायाचित्रांचा संग्रह लावण्यात आला होता. त्याच्यासमोर सर्व कलाकारांनी एकच जल्लोष करत एकमेकांना या चित्रिकरणासाठी शुभेच्छा दिल्या.

चित्रपटामध्ये अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे, त्याच्यासोबत माजी क्रिकेट कर्णधार कृष्णमाचारी श्रीकांत यांची भूमिका दाक्षिणात्य अभिनेता जीवा वठविणार आहे. तर भारताचा माजी यष्टीरक्षक सय्यद किरमानी यांची भूमिका साहिल खट्टर साकारणार आहे. पंजाबी अभिनेता एमी विर्कही या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)